महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र; पाटील, तावडेंसह पंकजा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आऊट? - PM Modi speech in Nashik public meeting

महाराष्ट्रातील जनताही देंवेद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या सरकारवर नक्कीच विश्वास दाखवेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यामुळे भाजपतर्फे राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा देंवेद्र फडणवीसच करतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

देंवेद्र फडणवीस

By

Published : Sep 19, 2019, 7:16 PM IST

Updated : Sep 19, 2019, 8:08 PM IST

नाशिक - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने मला पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसण्याची संधी दिली. महाराष्ट्रात देंवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर जनता खूष असून जनतेला त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बघायचं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा देंवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेचा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज नाशकात समारोप झाला. तपोवन परिसरात ही सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, भाजपचे केंद्रिय संघटन मंत्री धर्मेंद्र यादव, केंद्रिय सामाजिक न्याय्य राज्यमंत्री रामदास आठवले, नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार सीमा पवार, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फंरादे आदी नेते यावेळी उपस्थितीत होते.

यावेळी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशाच्या जनतेने माझ्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता महाराष्ट्रातील जनताही देंवेद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर नक्कीच विश्वास दाखवेल, असे म्हणत राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा देंवेद्र फडणवीसच करतील असे संकेत दिले आहेत. आजच्या या सभेत पंतप्रधानांनी विविध मुद्द्यावंर भाष्य केले. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोडभरुन कौतुक केल्याने भाजपमधील गुडघ्याला बांशिग बांधून बसलेल्या नेत्यांचे काय होणार असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचक वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु असतांना नितीन गडकरींच्या समर्थनार्थ आमदारांची जुळवा जुळव करणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यात भाजपचा महिला आणि ओबीसी चेहरा अशी ओळख असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, मागील दोन वर्षांपासून डार्क हार्स म्हणून पुढे आलेले नाव म्हणजे आशिष शेलार...या सर्वांचे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले नाव तुर्तास तरी आऊटच म्हणावे लागेल...

Last Updated : Sep 19, 2019, 8:08 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ent mar.

ABOUT THE AUTHOR

...view details