महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Suicide Firing Gun : उद्योजकाची राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या - Adgaon Police

प्लास्टिकचे कॅरेट बनविणाऱ्या व्यापाऱ्याने ( Suicide of a businessman ) लायसन्स असलेल्या बंदुकीतून डाेक्यात गाेळी झाडून ( Suicide by firing a gun ) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी आडगाव परिसरात घडली.आजारपणाला त्रस्त असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आडगाव पोलिसांनी ( Adgaon Police ) व्यक्त करुन आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.

Suicide of a businessman
व्यापाऱ्याची आत्महत्या

By

Published : Jul 23, 2022, 9:48 PM IST

नाशिक - फळभाज्यांसाठी लागणारे प्लास्टिकचे कॅरेट बनविणाऱ्या व्यापाऱ्याने ( Suicide of a businessman ) लायसन्स असलेल्या बंदुकीतून डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या ( Suicide by firing a gun ) केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी आडगाव परिसरात घडली आहे. आजारपणाला त्रस्त असल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रोशन ओमप्रकाश गोयल ( Roshan Omprakash Goyal ) ( वय ६० ) रा. पार्कसाइड हाेम, हनुमान नगर, आडगाव असे या मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. मद्याच्या नशेत त्यांनी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेतल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.

बंदुकीतून डोक्यावर गोळी झाडून घेतली -शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आजारपणाला त्रस्त असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आडगाव पोलिसांनी व्यक्त करुन आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. आडगाव पोलिसांच्या हद्दीतील पार्कसाइड होम येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गोयल कुटुंबीय राहतात. रोशन गोयल यांचा दिंडाेरीतील जानोरी येथे कॅरेट बनविण्याचा व्यवसाय होता. काही महिन्यांपासून ते काहीतरी आजाराने त्रस्त होते. शनिवारी दुपारी त्यांनी स्वत:ला खोलीत बंद करुन घेतले. मद्यप्राशन केले असताना नशेतच त्यांनी स्वत:च्या परवानाधारक बंदुकीतून डोक्यावर गोळी झाडून घेतली. यावेळी मोठ्याने झालेल्या आवाजाने त्यांची पत्नी खोलीच्या दिशेने आली. दरवाजा उघडत नसल्याने शेजारच्यांना बोलविण्यात आले. दरवाजा तोडल्यावर गोयल यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी सांगितले आहे.


हेही वाचा -Smriti Irani On Congress : गोवा अनधिकृत बार प्रकरणावरुन कॉंग्रेसचे स्मृती इराणीवर आरोप; इराणींनीही दिले जोरदार प्रत्युत्तर, पाहा कोण काय म्हणाले..

गोयल मूळचे हरियाणातील -गोयल हे मूळ हरियाणातील असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मुलगा,मुलगी विवाहित असून ते मूळ गावी आहेत. त्यांचा मुलगा हरियाणात कॅरेट व्यवसाय करीत असल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेमुळे व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली असून आडगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा -Viral video : चक्क बापानेच पाजली मुलांना दारू, अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details