महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक! पत्नीला अश्लील व्हिडिओ दाखवून पतीकडून विकृत शारीरिक अत्याचार - physical abuse case in nashik

पत्नीला अश्लील व्हिडिओ दाखवून विकृत लैंगिक अत्याचार करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित पती व मानसीक छळ करणारे सासू-सासरे यांच्या विरोधात नाशिकच्या सातपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Physical abuse case registered against husband by showing obscene video to wife
पत्नीला अश्लील व्हिडिओ दाखवून पतीकडून विकृत शारीरिक अत्याचार

By

Published : Nov 30, 2019, 7:26 PM IST

नाशिक - पत्नीला अश्लील व्हिडिओ दाखवून विकृत लैंगिक अत्याचार करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित जोडप्याचा प्रेम विवाह झाला होता.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित पती व मानसीक छळ करणारे सासू-सासरे यांच्या विरोधात नाशिकच्या सातपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला कामगार नगर, सातपूर येथील रहिवासी असून संशयित पती हा मूळचा (नजफगड) दिल्ली येथील आहे.

लग्नापूर्वी देखील पतीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिलेने केला आहे. लग्न झाल्यानंतर परदेशात फिरायला गेल्यावर तसेच राहत्या घरी देखील पतीने अश्लील फिल्म दाखवत पीडितेवर वारंवार विकृतपणे अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यास विरोध केल्यानंतर पतीने मारहाण केल्याचे फिर्यादीत आहे. तसेच गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा पतीवर आरोप करण्यात आला आहे.

घडलेला प्रकार सासू-सासर्‍यांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडून मदत होण्याऐवजी शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्याचे संबंधित पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details