महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तुम्हाला माहिती आहे का.. विमानाच्या इंधनापेक्षा पेट्रोलचे दर आहेत दुप्पट - पेट्रोल दरवाढ

महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी पार केली असून नाशिक जिल्ह्यात वाहनधारकांना पेट्रोल 108 रुपये लिटर दराने खरेदी करावे लागत आहे. दुसरीकडे विमानासाठी लागणारे पेट्रोल 60 रुपये लिटर दराने मिळत असल्याने विमानापेक्षा वाहनाचा प्रवास महाग झाला आहे.

fuel rate hike
fuel rate hike

By

Published : Aug 5, 2021, 2:00 AM IST

नाशिक - महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी पार केली असून नाशिक जिल्ह्यात वाहनधारकांना पेट्रोल 108 रुपये लिटर दराने खरेदी करावे लागत आहे. दुसरीकडे विमानासाठी लागणारे पेट्रोल 60 रुपये लिटर दराने मिळत असल्याने विमानापेक्षा वाहनाचा प्रवास महाग झाला आहे. पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दराच्या बाबतीत होणारी वाढ मात्र विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरापेक्षा चक्क दुप्पट आहे. पेट्रोल-डिझेलपेक्षा विमानाचे इंधन स्वस्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्य वाहन धारकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. नाशिक शहरात पेट्रोलचा भाव प्रति लिटर 108 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला असून डिझेलचा भाव प्रति लिटर 96 रुपयांपर्यंत आहे. मात्र विमानांसाठी लागणारे एटीएफ इंधनाचे भाव प्रति लिटर केवळ 60 रुपये इतके आहेत.

नाशिक शहरात 7 लाख 60 हजार 995 दुचाक्या आणि 3 लाख 85 हजार 725 चारचाकी वाहने आहेत. शहरात 70 पेट्रोल पंप असून दररोज साधारणपणे 2 लाख 83 हजाराच्या आसपास पेट्रोलची विक्री होते.

रोज पेट्रोलच्या भावात वाढ होत असल्याने महिन्याचा आर्थिक खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे, माझा मार्केटिंगचा जॉब असून मला रोज शहरात 100 किलोमीटर फिरावे लागते. माझी दुचाकी 40 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. त्यामुळे मला रोज 250 रुपयांचे पेट्रोल लागते. म्हणजे महिन्याला साधारण 7 हजार रुपये फक्त पेट्रोलवर खर्च होतात, अशात मागील दोन वर्षांपासून पगार वाढला नाही, मात्र पेट्रोल खर्च वाढला आहे. आता घरखर्च कसा करावा, असा प्रश्न माझ्या समोर असल्याचे दुचाकीचालक किरण सोनार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details