नाशिक - मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेली दरभंगा पवन एक्सप्रेसचे 11 डब्बे रेल्वे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना घडली ( Nashik Pawan Express Derailed ) आहे. ही घटना दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी इगतपुरी स्थानकाच्या देवळाली ते लहवी दरम्यान घडली आहेत. या दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद करण्यात आली नाही, तर 6 जण जखमी झाले आहेत. सापडलेला एक मृतदेह हा रेल्वेरुळाजवळ पूर्वीपासून पडलेला असू शकतो, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल -शिवाजी सुतार यांनी सांगितले की, ट्रेन क्रमांक 11061 एलटीटी - जयनगर एक्सप्रेसचे काही डबे नाशिक जवळील देवळाली ते लहवीत स्थानकादरम्यान रेल्वे रूळाखाली घसरलेले आहे. ही घटना आज दुपारी तीन वाजून दहा मिनिटाच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अभियांत्रिकी पथक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांसाठी वैद्यकीय पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या मदतीसाठी मदत क्रमांक रेल्वेकडून जारी केला आहे.
रेल्वे रुळाला तडे -पवन एक्सप्रेसच्या या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय आहे, याबाबत रेल्वे कडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
नाशिकहून जयनगरसाठी विशेष ट्रेनचे नियोजन -इगतपुरी आणि देवलाली दरम्यान ट्रेन क्रमांक 11061 (LTT - जयनगर पवन एक्स्प्रेस) रुळावरून घसरली आहे. यातील सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह नाशिकरोड स्थानकावर आणण्यात येत आहे. नाशिकहून जयनगरसाठी विशेष ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे, सर्व इच्छुक प्रवासी या विशेष ट्रेनने त्यांच्या मार्गस्थानी जाऊ शकतात, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले.
अपघातातील जखमींची नावे -
1. पुष्पा मेहतो (वय 45)
2. मुकेश मेहतो (वय 46)
3. सरोज मिश्रा (वय 51)
6. लखीमचंद (वय 52)
दरम्यान, अपघातातील मृताची ओळख अद्याप पटलेले नाही.