महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात सलून व्यवसायिक रस्त्यावर; दुकानं सुरू करण्यासाठी जेलभरो आंदोलनाचा इशारा - nashik saloon news

लॉकडाऊनची सुरुवात झाल्यानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वत्र दुकाने बंद करण्यात आली. यानंतर आता संचारबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत असल्याने जवळपास सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप सलून बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानं उघडू न दिल्याने सलून व्यवसायिक संतप्त झाले आहेत.

nashik saloon news
लॉकडाऊनच्या काळात दुकानं उघडू न दिल्याने सलून व्यवसायिक संतप्त झाले आहेत.

By

Published : Jun 10, 2020, 6:48 PM IST

नाशिक - लॉकडाऊनची सुरुवात झाल्यानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वत्र दुकाने बंद करण्यात आली. यानंतर आता संचारबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत असल्याने जवळपास सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप सलून बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानं उघडू न दिल्याने सलून व्यवसायिक संतप्त झाले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात दुकानं उघडू न दिल्याने सलून व्यवसायिक संतप्त झाले आहेत.

संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने सलून बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आता सलून चालवणारे व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील अडीच महिन्यांपासून रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे आता व्यवसायिक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने येत्या १५ जूनपर्यंत दुकानं सुरू करण्यास परवानगी न दिल्यास कायद्याच्या विरोधात जाऊन दुकानं सुरू करणार असल्याचा पवित्रा सलून व्यवसायिकांनी घेतला आहे. तसेच गरज पडल्यास कुटुंबीयांसह जेलभरो आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिलाय.

अनेकदा निवेदन देऊन देखील शासनाने दखल न घेतल्याने नाशिक जिल्हा सलून व्यावसायिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास लवकरच आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय पंडित सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details