महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut On Raj Thackeray : काल परवा हिंदुत्व हाती घेतलेले ओवैसी महाराष्ट्रात चालणार नाहीत : राऊतांचा राज ठाकरेंना टोला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला ( Sanjay Raut Criticized Raj Thackeray ) आहे. भाजपने उत्तर प्रदेशात जे काम ओवैसीकडून करून घेतले तेच काम महाराष्ट्रात मनसेकडून करून घेत आहेत. हे काळ पर्वा हिंदुत्व हाती घेतलेले ओवैसी महाराष्ट्रात चालणार नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरेंचा समाचार ( Sanjay Raut Called MNS As Owaisi ) घेतला.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Apr 15, 2022, 4:03 PM IST

नाशिक :- भाजपणे ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात ओवैसीकडून काम करुन घेतलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मनसेचा वापर केला जात ( Sanjay Raut Criticized Raj Thackeray ) आहे. वापर करु द्या पण शिवसेनेला त्याचा फटका बसणार ( Sanjay Raut Called MNS As Owaisi ) नाही. मुंबईसह सर्व ठिकाणी शिवसेना विजयी होईल. काल परवा हिंदुत्व हाती घेतलेले औवेसी महाराष्ट्रात चालणार नाहीत, या शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता मनसेवर हल्ला चढवला.


सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा :शिवसेना नेते खा.संजय राऊत दोन दिवस नाशिक दौर्‍यावर ( Sanjay Raut In Nashik ) असून, येथे आगमन झाल्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच खरी हिंदुत्ववादी आहे. आम्ही नाशिक जिंकणार. तसंच मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली जिंकणार, असे सांगत त्यांनी मनसेची तुलना औवेसीशी केली. सोमय्यांनी ठाकरे परिवारावर आज केलेल्या आरोपावर बोलताना सौमय्यांनी आधी आयएनएस विक्रांत ( Sanjay Raut Criticized Kirit Somaiya ) घोटाळ्यावर बोलावे असा पलटवार केला. सौमय्या हा अंतरिम जामीनावर बाहेर असलेला आरोपी आहे. देशात जे अंतरिम दिलासा घोटाळा सुरु आहे. सौमय्या हा त्याचा लाभार्थी आहे. विक्रांतचे ५८ कोटी भाजपच्या फंडात जमा केले, हे आरोपी सौमय्याने न्यायालयात सांगितले आहे. अपहार केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होणार असून, सौमय्या लवकरच तुरुंगात दिसेल असा पुनरुच्चार करत स्वत:वरील घोटळ्याच्या आरोपाकडे दुर्लक्ष करण्यासाठी इतरांवर आरोप केले जात असल्याची टीका खा.राऊत यांनी केली. सोमय्या यांचा टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढणार, असल्याचे राऊत यानी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा : INS विक्रांत नंतर सोमय्यांची आता 'टॉयलेट एक लव्ह स्टोरी'

ABOUT THE AUTHOR

...view details