महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Road Central Jail : पॅरोलवर असणाऱ्या 800 कैद्यांना जेलमध्ये परतण्याचे आदेश

पॅरोलवर बाहेर असलेले नाशिक रोड जेलमधील कैद्यांना जेलमध्ये परतावे लागणार आहे. ( 800 prisoners on parole in Nashik ) कोराेना प्रादुर्भाव ( Corona Nashik Jail ) कमी झाल्याने या कैद्यांना येत्या 15 दिवसांत कारागृहात ( Prisoners will have report to the jail within 15 days ) परतावे लागणार आहे. त्याबाबतचा आदेश शासनाने काढला असून या आदेशा विराेधात अनेक कैद्यांचे वकील न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे.

Nashik jail
Nashik jail

By

Published : May 8, 2022, 3:36 PM IST

नाशिक - कोराेना महामारीमुळे नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहाने पॅरोलवर ( 800 prisoners on parole in Nashik Road Central Jail ) साेडलेल्या 800 कैद्यांना पुन्हा कारागृहात हजर हाेण्यास सांगितले आहे. कोराेना प्रादुर्भाव ( Corona Nashik Jail ) कमी झाल्याने या कैद्यांना येत्या 15 दिवसांत कारागृहात ( Prisoners will have report to the jail within 15 days ) परतावे लागणार आहे. त्याबाबतचा आदेश शासनाने काढला असून या आदेशा विराेधात अनेक कैद्यांचे वकील न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे.

शासनाने १० फेब्रुवारी २०२२ चे अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित व अभिवचन रजा) नियम, १९५९ चा नियम १९ हा आकस्मिक अभिवचन रजेच्या तरतुर्दीसह बदलला आहे. प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य कार्यकारी समिती यांनी दि.३१.०३.२०२२ रोजीच्या आदेशानुसार, कोविड १९ च्या अनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत लागू असलेले सर्व निर्बंध ०१ एप्रिल २०२२ पासून काढून घेतले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही बंद्यास कोरोना आकस्मिक अभिवचन रजा मंजूर करता येणार नाही. तसेच अधिसूचना रद्द केली असल्याने, कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील बंद्याना कारागृहात दाखल करुन घेणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. त्यानुसार अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेल्या सर्व बंद्यांना तत्काळ कारागृहात दाखल करुन घ्यावे. बंद्यांना दाखल करुन घेताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असून बंद्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारागृहात दाखल करुन घ्यावे. अभिवचन रजेचा ४५ दिवसांचा अथवा वाढीव रजेचा ३० दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जास्तीत जास्त १५ दिवसांच्या वाढीव कालावधीत बंद्यांना दाखल करुन घ्यावे. बंदी कारागृहामध्ये दाखल न झाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.


काेर्टात धाव घेणार :नाशिक सेंट्रल जेलमधून जवळपास 800 बंदी आणि ट्रायलवरील कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. बाहेर असलेल्या कैद्यांना आता 15 दिवसात जेलमध्ये हजर व्हावे लागणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या आदेशाविरोधात अनेक कैद्यांचे वकील कोर्टात धाव घेणार असल्याचे समाेर येते आहे. कोराेना साथीमुळे नाशिक राेड कारागृहातून 800 कैद्यांना पॅराेल मंजूर करण्यात आला हाेता. आता शासनाने आदेश काढले असून 15 दिवसांत या कैद्यांना कारागृहात हजर व्हावे लागणार आहे. त्यानुसार आम्ही संबंधित कैद्यांना परत बाेलविण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे तुरुंग अधीक्षक प्रमाेद वाघ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Rape with Minor In Bharatpur : भरतपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details