नाशिक -राज्यातील १ लाख रुपये उत्पन्न असलेल्या केशरी रेशनकार्ड धारकांना देखील सध्याच्या परिस्थितीत रेशन मिळावे. राज्य सरकारकडून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्य सरकारने यासाठी हालचाली सुरू केल्या असून लवकरच अंत्योदय योजनेप्रमाणे एक लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना देखील रेशन मिळू शकणार आहे.
..आता केशरी रेशनकार्ड धारकांनाही मिळणार रेशन; सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
राज्यातील १ लाख रुपये उत्पन्न असलेल्या केशरी रेशनकार्ड धारकांना देखील सध्याच्या परिस्थितीत रेशन मिळावे. राज्य सरकारकडून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
हेही वाचा...... आता आग नाही लावली म्हणजे झालं, दिवे लावण्याच्या कल्पनेवरुन मोदींवर सोशल मीडियावर टीका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकट काळात सर्वांनाच स्वस्त दरात रेशन देण्याचा सरकारचा विचार आहे. अंदाजे सव्वा दोन कोटी नागरिकांना सरकारच्या या नव्या निर्णयाचा लाभ होणार आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत नाशिकमध्ये माहिती दिली आहे. जवळपास सरकारला या निर्णयानुसार रेशन वाटप केल्यास महिन्याला 400 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. राज्यासह देशभरात आलेल्या आपत्तीला सामोरे जात असताना प्रत्येकालाच स्वस्त दरात धान्य मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक लाख रुपये पर्यंत उत्पन्न असलेल्यांना आता या नव्या निर्णयानुसार लवकरच लाभ घेता येणार आहे.