मालेगाव :राज्य सरकारने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप केला असुन,याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच मी बोलेल असेही यावेळी त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते पवारहे काल एक दिवसीय मालेगाव दौऱ्यावर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेटीवर अजितदादा म्हणाले की, आपण या भेटीवरून गैरसमज पसरवू नका अशी विनंती केली. विरोधी पक्षनेते पवारहे काल एक दिवसीय मालेगाव दौऱ्यावर नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
सरकारने योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित - दिवाळीनिमित्त प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना अन्नधान्य व्यतिरिक्त शंभर रुपयांत सामान देण्यात येणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या गोरगरिबांना दिवाळीनिमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले असून, या योंजनेत शंभर टक्के गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या बाबत आकडेवारी घेत असून आकडेवारी मिळताच ती जनते समोर ठेवणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.