महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यात पाणीबाणीची शक्यता गडद, 24 धरणांमध्ये केवळ 26 टक्के पाणीसाठा - धरण पाणीसाठा नाशिक

जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. नाशिकसह मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात केवळ २५ टक्के, तर जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये २६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

water in all dams of nashik district
धरण पाणीसाठा नाशिक

By

Published : Jun 19, 2022, 2:31 PM IST

नाशिक - जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. नाशिकसह मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात केवळ २५ टक्के, तर जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये २६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नाशिक जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट गडद झाल आहे.

माहिती देताना कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

हेही वाचा -Chhagan Bhujbal : 'विधानपरिषदेवर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील'

जिल्ह्यात २५२ वाडी वस्त्यांना ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा -जून महिन्याचा दुसरा आठवडा लोटूनही नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात २५२ वाडी वस्त्या आणि गावांना ८४ टँकरद्वारे दीड लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागवली जात आहे. मात्र, पुढच्या आठवडाभरात जिल्ह्यात पावसाने अशीच दडी मारली तर नाशिक शहर वासियांवर पाणी कपात लादली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर जिल्ह्यातील २४ धरणांपैकी ४ धरणांमधील पाणीसाठा शुन्य झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही धरणांमधून सोडला जाणार पाण्याचा आवर्तन बंद होऊ शकतो, अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात ७ मोठे तर १६ मध्यम प्रकल्प आहे. या सर्व धरणांमध्ये केवळ २६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर ४ धरणांमध्ये शुन्य टक्के इतका पाणीसाठा झाल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहात सद्यस्थितीत किती पाणीसाठा शिल्लक?

गंगापूर धरण समूह - २५ टक्के
पालखेड करंजवन समूह - १९ टक्के
ओझारखेड पूनेगाव समूह - २० टक्के
दारणा नंदुरमध्यमेश्वर समूह - २४ टक्के
चणकापुर गिरणा समूह - २७ टक्के
पूनद मानिकपुंज - १४ टक्के

तर जिल्ह्यातील तिसगाव, नागासाक्या, मानीकपुंज, केळझर या चार धरणांमध्ये तर पाणीसाठा शून्य टक्क्यावर जाऊन पोहचलाय. त्यामुळे जिल्ह्यातील धरण हळू हळू तळ गाठत येत्या आठवड्याभरात पाऊस न पडल्यास जिल्ह्यात पाणीबाणी अधिक गडद होऊ शकते.

हेही वाचा -नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, तुरळक ठिकाणी पेरणीस सुरवात

ABOUT THE AUTHOR

...view details