नाशिक - सिम कार्ड अद्ययावत करण्यासाठी कागदपत्रांची माहिती द्या म्हणत, भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या व्यक्तींना फरांदे यांच्या मुलीला ३४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आमदार फरांदे यांच्या मुलीची ऑनलाइन फसवणूक, अकाउंटमधून ३४ हजार झाले कट
भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या व्यक्तींना फरांदे यांच्या मुलीला ३४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
खोटे बोलून ओटीपी शेअर सांगितले
भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीची ३४ हजार ८९१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायली फरांदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनूसार (१९ मे) रोजी त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून कॉल आला. तुम्ही केवायसी अपडेट केले नाही, तर तुमचे सिम कार्ड बंद होईल असे त्यावर सांगण्यात आले. त्यानंतर सायली यांना हे अॅप डाऊनलोड करायला सांगितले. दरम्यान, त्यावर येणारा ओटीपी आपल्याला शेअर करा असे सांगितले. त्यानंतर सायली यांच्या अकाउंटमधून पैसे गायब झाले आहेत हे लक्षात आले. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांसोबतच आता आमदारांच्या घरातही अशी फसवणूक होत आहे. दरम्यान, सायली फरांदे यांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस पुढील तपास करत आहेत