नाशिक- जिल्ह्यातील चांदवड शहरालगत असलेल्या खैसवाडा वस्तीवर अज्ञात ५ ते ६ लोकांनी नामदेव मोरे यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून मोरे यांना गंभीर जखमी केले. मोरे यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. गावकरी आणि चोरांत झालेल्या तुफान हाणामारीत एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिकमध्ये दरोडेखोर व गावकऱ्यांमध्ये झटापट.. जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, ४ जण गंभीर - जखमी
मोरे यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे ग्रामस्थ आले. यावेळी हाणामारी होऊन एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य ४ फरार झाले.
नामदेव मोरे खैसवाडा वस्तीवर आपल्या कुटुंबीयांसह बाहेर झोपलेले होते. एका टोळक्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी मोरे यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे ग्रामस्थ आले. यात झटापट होऊन एका चोराचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य ४ फरार झाले. चौघांपैकी आणखी एका चोराला पकडण्यात यश आले असून त्याच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.
घटनास्थळी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक निलोतपल, उपविभागीय पोलीस अधिकारी रागसुधा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत चांडवड परिसरात चोर पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. या घटनेमुळे चांदवड परिसरात खळबळ उडाली असून नेमका हा प्रकार काय आहे? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.