नाशिक - बेकायदेशीर धर्मपरिवर्तन केल्याच्या देशपातळीवरील प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने नाशिकमध्ये कारवाई करुन यात सहभागी नाशिकच्या एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणात रविवारी नव्याने तीन जणांना अटक करण्यात आली असून, गेल्या जूनमध्ये उघड झालेल्या बेकायदेशीर धार्मिक धर्मांतराचे देशव्यापी रॅकेट आणि धर्मांतर करण्यासाठी परदेशातून निधी घेतल्याबद्दलच्या गुन्ह्यात उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथकाने देशपातळीवर कारवाई केली आहे.
एटीएसने मौलाना उमर गौतमला जूनमध्ये अटक केली हाेती
या कारवाईत मुझफ्फरनगरला राहणारे मोहम्मद इद्रिस आणि मोहम्मद सलीम आणि नाशिकमध्ये राहणारा कुणाल अशोक चौधरी उर्फ आतिफ यांना बेकायदेशीर रॅकेट चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. एटीएसने मौलाना उमर गौतमला जूनमध्ये बेकायदेशीर धार्मिक धर्मांतराचे रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली हाेती. तसेच, मेरठ येथून नुकतेच मौलाना कलीम सिद्दीकीला अटक करण्यात आली होती.
अटक केलेले तिघे मौलाना कलीम सिद्दीकीचे साथीदार आहेत
अटकेतील सलीमने सिद्दीकीला १७ वर्षे धार्मिक धर्मांतर करण्यात मदत केली. त्याचप्रमाणे इद्रिस आणि चौधरी देखील सिद्दीकीला धार्मिक धर्मांतरामध्ये मदत केली आहे. असे स्पष्ट हाेत आहे. अटक केलेले तिघे मौलाना कलीम सिद्दीकीचे साथीदार असून सिद्दिकी ५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, एटीएसने आतापर्यंत देशाच्या विविध भागातून १० ते १२ जणांना अटक केली आहे. जामिया इमाम वलीउल्लाहच्या नावाने ट्रस्ट चालवणारे सिद्दीकी शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या नावाने चालवले जाणारे अवैध धर्मांतर रॅकेटमध्ये सामील होते. संघटीत पद्धतीने अवैध धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी निधी वापरला जात होता, यामधून असे समोर आले आहे.
धर्मांतरण करून घेण्याला मी माझी जबाबदारी मानली आहे
एटीएसने जेव्हा चौकशी केली तेव्हा मौलाना सिद्दीकीने सांगितेले की, धर्मांतरण करून घेण्याला मी माझी जबाबदारी मानली आहे. आम्ही जेव्हा धर्मांतरण करून घेतो, तेव्हा विदेशात असलेले आमचे सहकारी आहेत त्यांना याबाबत आम्ही माहिती देतो. तसेच, जे धर्मांतरण करतात त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो. तसेच, मलाही माठा आर्थिक लाभ होतो असही सिद्दीकीने सांगितले आहे. तसेच, मी जेव्हा धर्मांतरणाच्या कामासाठी बाहेर जातो तेव्हा माझ्यासोबत हे मोहम्मद सलीम, कुणार चौधरी उर्फ अतिफ हाफिज हे सोबत असतात असही यावेळी सिद्दीकीने सांगितले आहे.
ट्रस्टमधून इंडियन बँकेच्या खात्यात सुमारे 1.5 कोटी रुपये प्राप्त
सिद्दीकी संचलित जमीयते इमाम वलीउल्लाह ट्रस्टमध्ये 3 कोटी जमा झाल्याचे समोर आले आहे. तसेच, या ट्रस्टच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये सुमारे 20 कोटी रुपये जमा झाल्याची माहितीही समोर आली आहे. या ट्रस्टमधून इंडियन बँकेच्या खात्यात सुमारे 1.5 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मोठी रक्कम कलीम सिद्दीकीने त्याच्यासोबत धर्मांतर (दाई)मध्ये गुंतलेल्या लोकांना पाठवली असल्याचे समोर आले आहे.