नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नाशिकच्या छत्रपती सेनेतर्फे 131 किलो वजनाची वाघनखे तर 92 किलो वजनाची कट्यार साकारण्यात आली आहे. ((Shivaji Jayanti Nashik) या भव्य वाघनखे, कट्याची विश्वविक्रमात नोंद होणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.
प्रतिकृती शिवाजी महाराज स्मारकात ठेवण्यात येणार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी वेगवेगळ्या भव्य प्रतिकृतीच्या माध्यमातून विश्वविक्रम करणाऱ्या छत्रपती सेनेतर्फे या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेल्या वाघनखे याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. ही सहा फूट रुंद व अडीच फूट उंचीची लोखंडी वाघनखे असून त्याचे वजन 130 किलो आहे. (Waghankhe and 92 kg katyar were made In Nashik) त्यासोबतच लोखंड व पीतळापासून आठ फूट उंचीची 92 किलो वजनाची कट्यार साकारण्यात आली आहे. शिवजन्मोउत्सवा निमित्ताने नागरिकांना भव्य वाघनखे, कट्यार बघता यावी यासाठी 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी सीबीएस येथील शिवाजी महाराज स्मारकात ठेवण्यात येणार आहे.
याआधी देखील विश्वविक्रम