नाशिक -दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी येथे एका युवकाने वृध्द व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला करून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. जादूटोणा प्रकरणात ही हत्या झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघडकीस आले. दिंडोरी पोलिसांनी याप्रकरणी भास्कर रमेश बुरंगे या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... VIDEO: दारूसाठी वाटेल ते.. वाईन शॉपमधून बघायला म्हणून घेतलेल्या बाटलीसह तळीरामाने ठोकली धूम
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीसाठी जागा दिली नाही म्हणून वृद्ध आपल्यावर जादूटोणा करत असल्याचा संशय या युवकाच्या मनात होता. तसेच त्यामुळे आपली तब्बेत खराब राहते, असाही समज त्याने करून घेतला होता. त्यामुळे रमेश बुरंगे याने तिल्लोळी येथील त्र्यंबक आबाजी टोंगारे (73) यांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण हत्या केली.
हेही वाचा... 'कोल्हापूरकरांनो, लक्षात ठेवा तुमचा फोन यमालाही लागू शकतो'
मृत त्र्यंबक टोंगारे यांनी भास्कर रमेश बुरंगे याच्याकडे 5 वर्षांपूर्वी विहिरीसाठी जागा मागितली होती. मात्र, त्याने ती दिली नाही. त्यामुळे टोंगारे यांनी आपल्यावर जादूटोणा करण्यास सुरूवात केल्याचे रमेशला वाटत होते. त्यातच त्याची तब्बेत ठिक नसत. त्यामुळे त्याने अविचाराने अखेर टोंगारे यांच्यासोबत भांडण केले. मंगळवारी सकाळी त्र्यंबक टोंगारे हे नाळेगाव रस्त्याकडे घेऊन जात असताना, रमेश बुरंगे याने मागून येत त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात टोंगारे यांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला तातडीने अटक केली.
हेही वाचा... महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी