नाशिक- देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठिकठिकाणी मतदारांसाठी प्रबोधन करण्यात येत आहे. शहरातील लहान-मोठे व्यावसायिक यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. व्यावसायिकांकडून मतदान करणाऱ्यांसाठी विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
नाशकात मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदारांवर ऑफर्सची बरसात
व्यावसायिकांकडून मतदान करणाऱ्यांसाठी विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत
रामवाडी येथील एका केशकर्तनालयात शाईचे बोट दाखवले तर कटिंगवर 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर, विड्याच्या पानाचे विविध प्रकार नाशिक शहरात सुरू झाले आहेत. पानापासून चॉकलेट, पायनॅपल, मलाई या प्रकारांना ग्राहकांची मागणी असते. या पानांवर मतदान केलेल्या व्यक्तीला उद्याच्या दिवशी 10 टक्के सूट मिळणार आहे. तसेच लोकशाही प्रक्रियेत प्रथमच सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी म्हणजेच मतदारांसाठी अनुपम डॉट कॉम या विवाह संस्था व लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे प्रोत्साहनपर योजना घोषित करण्यात आली आहे. यामधून अनेकांचे विवाह जमणार आहेत. जे मतदार मतदान करतील व विवाह इच्छुक असतील त्यांना अनुपम शादीतर्फे पंधराशे रुपयांची मेंबरशिप मोफत देण्यात येणार आहे. या अफलातुन ऑफर्समुळे मतदानाची टक्केवारी वाढणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.