नाशिक:नाशिकच्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरला होता,या मेळाव्यासाठी सप्तशृंगी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल झाले होते,यात मुंबई, पुणे,कल्याण,नाशिक,गुजरात व मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता.तृतीयपंथींकडून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीचा छबिना म्हणजे मिरवणूक काढण्यात ( Occasion on Kojagiri Purnima depiction of third gender at Saptshringi fort ) आली. यानंतर रात्री त्यांचा मेळावा भरला.यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. शिष्याला दीक्षा देण्याचाही कार्यक्रम झाले. रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन करण्यात आले.
पौर्णिमेची सांगता - तृतीयपंथींनी ठिकठिकाणच्या कार्यक्रमात जाऊन नृत्य केले.पौर्णिमेला तृतीयपंथीयांची मोठ्या प्रमाणावर गडावर उपस्थिती होत असते, या सोहळ्यात सवाद्य मिरवणुकीत सुवर्णालंकार परिधान करून तृतीयपंथी सहभागी होतात.पौर्णिमेला सायंकाळी अभिषेक प्रारंभाची प्रतिवर्षीची परंपरा आहे रात्री 12 वाजता अभिषेक पूर्णाहुती व कोजागरीची सांगता करण्यात आली.