महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक शहरातील कोरोना रुग्णालयांची स्थिती पहा; चार दिवसात वाढवले हजार बेड - नाशिक कोरोना घडामोडी

नाशिक महानगरपालिकेने चार दिवसात 1019 नवीन खाट वाढवले आहेत. त्यामुळे आता 115 रुग्णालयांमध्ये 4565 खाट उपलब्ध झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात झपाट्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे.

By

Published : Mar 31, 2021, 5:25 PM IST

Updated : Mar 31, 2021, 7:24 PM IST

नाशिक- शहरात दिवसाला 2 हजारापर्यंत नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने नाशिक महानगरपालिकेने चार दिवसात 1019 नवीन खाट वाढवले आहेत. त्यामुळे आता 115 रुग्णालयांमध्ये 4565 खाट उपलब्ध झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात झपाट्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे.

जिल्ह्यात रोज 4 हजार नवीन रुग्णांची भर पडत असून ह्यात नाशिक शहरात रोज सर्वाधिक 2 हजारापर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. सध्य स्थितीत शहरात 15 हजार 908 रुग्ण उपचार घेत असून 1277 प्रतिबंधित क्षत्रे आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला असून बंद करण्यात आलेली कोरोना केंद्रे पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. तसेच मागील चार दिवसात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता देण्यात आली असून 1 हजार 19 नवीन खाट वाढविण्यासाठी आले आहेत. सद्य स्थितीत शहरात आता 115 रुग्णालयात 4330 खाट उपलब्ध झाले आहेत.

रुग्णांचा खासगी रुग्णालयांकडे ओढा

नाशिक महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खाट उपलब्धता यंत्रणेवर खासगी रुग्णालयात एकूण 921 ऑक्सिजन खाट शिल्लक दिसत आहेत. तर 228 व्हेंटिलेटर खाट शिल्लक आहेत. दरम्यान, खाट मिळत नसल्याच्या तक्रारींचा आयुक्तांनी अंदाज घेतल्यानंतर प्रामुख्याने रुग्णांचा ओढा बड्या रुग्णालयांकडे असल्यामुळे येथे उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे.

खाटांची संख्या वाढवली

महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे मार्च महिन्यात तब्बल 30 हजार रुग्ण आढळून आले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते की काय असे चित्र आहे, दिवसाला दोन हजारापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे प्रकार आठवडाभरापासून सुरू झाले आहे.त्यामुळे वाढत्या रुग्णांना बेड कसे मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर बहुतांशी कोरोना बाधित व्यक्ती घरगुती विलगीकरणात रहाणे पसंत करत आहे.मात्र तीव्र लक्षणे आहे त्यांना सरकारी व खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे.अशा परिस्थितीत काही रुग्ण घरीच गंभीर झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात जात आहे.त्यावेळी बड्या रुग्णालयांना प्राधान्य दिले जात असून तिथे बेड शिल्लक नसल्याने शहरात बेड मिळत नसल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी आढावा घेतला असता महानगरपालिकेने डॉ झाकीर हुसेन आणि बिटको रुग्णालयात अनुक्रमे 150 आणि 500 बेड उपलब्ध करून दिले असून 500 बेडचे समाजकल्याण कोविड सेंटरही सुरू करण्यात आले आहे.या बरोबर 83 खाजगी रुग्णालयांमध्ये 3546 बेड उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या काही दिवसात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर आयुक्तांनी चार दिवसात तब्बल 36 रुग्णालयांमध्ये 1019 बेड वाढवले आहेत.त्यामुळे खाजगी रुग्णालयातील बेडची संख्या ही 4330 पर्यंत पोहोचली आहे.

रुग्णालयातील खाटांची सद्य परिस्थिती

एकूण रुग्णालये - 115

खाट - 4330
शिल्लक - 1768

आरक्षित खाट - 2562
शिल्लक - 1768

सर्वसाधारण खाट - 1362
शिल्लक - 470

ऑक्सिजन खाट - 1916
शिल्लक - 849

आयसीयू खाट - 453
शिल्लक - 228

सीसीसी खाट - 900
शिल्लक - 274

डीसीएचसी खाट - 2620
शिल्लक - 1477

डिसीएच खाट - 810
शिल्लक - 16

Last Updated : Mar 31, 2021, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details