नाशिक -शहराच्या मेट्रो, बससेवेला कोणीही विरोध केलेला नाही. मात्र, राज्यातील इतर शहरातील मेट्रो व बससेवेचा अभ्यास करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जगात कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यात नाही, सर्व तोट्यात आहे. आवश्यकता असेल तर अभ्यास करून निर्णय घ्यावा. मात्र कोणताही निर्णय घेताना त्याचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्य नाशिककरांवर पडायला नको, त्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे ग्रामविकास छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. भुजबळ यांनी बुधवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा... खाते वाटपासाठी महाआघाडीत खलबते, तिन्ही पक्ष नेत्यांची बैठक
बस सेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा. बस सेवा टॅक्स नाशिककरांच्या माथी बसणार आहे. हा नाशिकरांवर अतिरिक्त कर असणार आहे. त्यापेक्षा बस महामंडळला पैसे दिले तर चांगले होईल, अन्यथा १०० कोटी भुर्दंड पडेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महामंडळाची योग्य मदत घेण्याची आवश्यकता आहे. केवळ कंत्राट काढण्यासाठी प्राधान्य देऊ नये, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत पादचाऱ्यासाठी अनेक पादचारी पूल बांधले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर होत नाही. यासाठी आपण सुरुवातीलाच विरोध केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.