नाशिक भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष Pitru Paksha 2022 या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात, पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत No information about Date of Pitar नसली, तर 'सर्वपित्री अमावस्याला' सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ Shraddha should be done on Amavasya शकते, असे हिंदू धर्मात सांगितले आहे.
पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास 'पितृपक्ष' या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात. आणि आत्म्याची तृप्ती होते,त्यांना शांती मिळते, असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर सर्वपित्री अमावस्याला सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. मृत्यूनंतर जर पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म झाले नाही,तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे.