नाशिक -मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. याचा फटका तेथील नागरिकांना बसत आहे. तसेच, पूल नसल्याने अनेक वाड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. पाण्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नाही. शाळा अघोषित बंद झाली आहे. दुसरीकडे ग्रामस्थांनाही याच जिवघेण्या पाण्यातून जात कसरत करावी लागत आहे.
असाच एक व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. नाशिकमधील पेठ तालुक्यातील हा व्हिडिओ आहे. येथील देवाळाचा पाड्यात पक्का रस्ता, पूल नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी नदीनाल्याला पूर आल्याने पुलाअभावी नदी पार करावी लागत आहे. यासाठी पाड्यातील ग्रामस्थ एका मोठ्या भांड्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना बसवून जीव मुठीत घेत नदी पार करताना दिसत ( Student Cross River In Nashik ) आहेत.