महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'...तर कोरोनावर सहज मात शक्य' पाहा, काय म्हणाले इंदोरीकर महाराज - malegaon corona

योग्य त्या उपचारांबरोबर नकारात्मक विचार बाजूला ठेऊन सकारात्मक विचार अंगिकरल्यास कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे असे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे.

'...तर कोरोनावर सहज मात शक्य' पाहा, काय म्हणाले इंदोरीकर महाराज
'...तर कोरोनावर सहज मात शक्य' पाहा, काय म्हणाले इंदोरीकर महाराज

By

Published : Apr 21, 2021, 7:11 AM IST

Updated : Apr 21, 2021, 9:15 AM IST

नाशिक :कीर्तनाच्या खास शैलीमुळे राज्यभरात लोकप्रिय असलेले ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कोरोना संकटाचा धैर्याने सामना करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. कोरोनाला रोग म्हणण्यापेक्षा आपल्यावर आलेली ही परीक्षेची चाचणी आहे. या चाचणीत पास होऊन कोरोनाला हरवले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

'...तर कोरोनावर सहज मात शक्य'

सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात शक्य

योग्य त्या उपचारांबरोबर नकारात्मक विचार बाजूला ठेऊन सकारात्मक विचार अंगिकरल्यास कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे असे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे. मालेगाव येथील बारा बलुतेदार मित्र मंडळाने उभारलेल्या राम-रहीम डिसीएचसी सेंटरच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या मंडळाच्या वतीने मालेगावात ऑक्सिजनसह सुसज्ज असलेले ४५ बेडचे राम-रहीम 'डिसीएचसी' सेंटर उभारण्यात आले आहे. मालेगावातील कोरोना संसर्ग बाधित असलेल्या रुग्णांची बेड अभावी होणारी धावपळ या सेंटरमुळे काही अंशी थांबणार आहे. मालेगावातील खाजगी डॉक्टरांच्या मदतीने हे सेंटर सुरू राहणार आहे.

सेंटरमुळे शासकीय कोरोना सेंटरवरील ताण कमी होणार
मालेगाव शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्य स्थितीत मालेगाव शहरात दोन हजार वीस बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने मालेगावात डिसीएचसी सेंटर उभे राहणे गरजेचे होते. या सेंटरमुळे मालेगावातील शासकीय कोरोना सेंटरवरील ताण कमी होण्यास निश्चित मदत होईल. अशा सामाजिक संस्थांनी प्रत्येक तालुक्यात कोरोना सेंटर उभारल्यास नक्कीच कोरोनाविरोधातील लढ्यात मदत मिळेल असे सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे म्हणाले.

Last Updated : Apr 21, 2021, 9:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details