नाशिकमध्ये शहरातील टवाळखोरांना निर्भया पथकाचा दंडुका - निर्भया टीमची कामगिरी
महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाकडून धडक कारवाई सुरू असून, शहरातील ब्लॅकस्पॉट, उद्यान स्थळ आणि चौकात घोळका करून बसणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्याचा प्रसाद दिला जात आहे. या कारवाईने परिसरातील महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. ही कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी महिलांकडून होत आहे.
निर्भया पथक
नाशिक -नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता निर्भया पथकातील महिला पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. रस्त्याच्या बाजूला घोळका करून बसणाऱ्या टवाळखोरांना दंडुका बरसावला जात आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.
महिला अत्याचार करणाऱ्यांची यादी
महिला विरोधात लैंगिक गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. तसेच संबंधित महिलांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त दीपक पांडये यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.