महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक महानगरपालिकेत ड्रेसकोडचे नवीन नियम लागू - nashik mnc dress code

महापालिकेतील सुमारे पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या आदेशानुसार यापुढे टी शर्ट, जीन्स पॅन्ट तसेच स्लिपर घालून कामावर येण्यास बंदी करण्यात आली. तर महिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार दुपट्टा आणि ट्राऊझर यासारखे कपडे परिधान करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

nashik mnc
नाशिक मपना

By

Published : Dec 25, 2020, 6:34 PM IST

नाशिक - राज्य शासनाने सरकारी कार्यालयात कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश जाहीर केले होते. यानंतर आता नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेत नवा ड्रेस कोड लागू केला. सोमवारी 28 डिसेंबरपासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

शुक्रवारी खादीचा पेहराव -

महापालिकेतील सुमारे पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या आदेशानुसार यापुढे टी शर्ट, जीन्स पॅन्ट तसेच स्लिपर घालून कामावर येण्यास बंदी करण्यात आली. तर महिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार दुपट्टा आणि ट्राऊझर यासारखे कपडे परिधान करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. याच बरोबर खादीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड -

महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी ड्रेसकोड लागू केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details