नाशिक -नव्या शिंदे-भाजप सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेतून निवडला जाणार, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन नाशिकचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. राज्यात सध्या पोरखेळ सुरू आहे. नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडायचा आणि मुख्यमंत्री फुटीर शिवसेना गटातून होणार हे मोठी गंमत आहे, असा टोमणा भुजबळांनी लगावला ( Chhagan Bhujbal Taunt CM Eknath Shinde ) आहे.
भुजबळ फार्म येथे भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड हा निर्णय रद्द करत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला.