नाशिक -९४ वे अखिल भारतीय मराठी संमेलनात ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2021 ) एका परिसंवादाच्या निमित्ताने आलेले ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ( Senior Journalist Girish Kuber ) यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केल्याची ( Activists of Sambhaji Brigade Threw Ink ) घटना घडली आहे. या घटनेवर राज्यातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ( NCP Chief Sharad Pawar ) देखील प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेला असा हल्ला करण शोभत नाही. ही अत्यंत निंदनीय घटना आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
- 'महाराष्ट्राची ही संस्कृती नाही'
माध्यमांशी बोलतांना पवार म्हणाले की, गिरीश कुबेर यांच्यावर हल्ला ही घटना निंदनीय आहे. कोणत्याही प्रकारचे समर्थन नसून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. मी गिरीश कुबेर यांचे पुस्तक वाचले आहे, काही मुद्द्यांवर वाद आहे. मात्र त्या खोलात मी गेलो नाही. परंतु भूमिका मान्य नसेल तर वैचारिक चर्चा होऊ शकते. कोणत्याही संघटनेने असा हल्ला करणे शोभत नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.
- कार्यक्रमठिकाणी जात असताना कुबेरांवर शाईफेक