महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुजाण नागरिकांनी नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा - जिल्हाधिकारी

पर्यावरण व पशूपक्षांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या इजा व दुखापती टाळण्याच्यादृष्टीने नायलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये, म्हणून शासनामार्फत 2016 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 5 प्रमाणे या नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

nylon manja
नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा

By

Published : Dec 30, 2020, 7:52 PM IST

Updated : Dec 30, 2020, 8:07 PM IST

नाशिक - पतंगाच्या खेळाचा आनंद घेताना पक्षी व नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे देखील महत्वाचे असल्याने पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर टाळून सुजाण नागरिक म्हणून सर्वांनी नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलं आहे.

नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी
पर्यावरण व पशूपक्षांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या इजा व दुखापती टाळण्याच्यादृष्टीने नायलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये, म्हणून शासनामार्फत 2016 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 5 प्रमाणे या नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यानंतर देखील प्रशासनामार्फत वेळोवेळी 144 नियमांतर्गत जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. यानुसार प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कडक कार्यवाही करण्यात येत असते. परंतु जनहित व स्वहितासाठी नियमांचे पालन आणि अनुसरण प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक कायद्याची व नियमांची अंमलबजावणी करणे हे प्रशासन व पोलिस यंत्रणेची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे कायद्याची व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.प्रत्येक खेळामध्ये हार-जीत अशी स्पर्धा सुरूच असते. त्याचप्रमाणे पतंगाच्या खेळातील काटाकाटीचा आनंद घेताना पशुपक्षी व इतर नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये. तसेच नायलॉन मांजामुळे इतरांसोबत घडलेली दुर्घटना आपल्यासोबत देखील घडू शकते या जाणिवेतून नागरिकांनी नायलॉन मांजाच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माध्यमातून केले आहे.
Last Updated : Dec 30, 2020, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details