नाशिक- केरळ येथील अलपुझा येथे पारपडलेल्या 83 व्या ज्युनिअर आणि युवा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत ( 83rd Junior and Youth National Table Tennis ) 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात नाशिकच्या तनिषा कोटेचा हिने विजय मिळत राष्ट्रीय चॅम्पियन ( National champion Tanisha Kote ) पटकावले. स्पर्धेत अंतिम लढतीत तनिषाने प्रतिस्पर्धी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या सुभंक्रिताचा ( National Center of Excellences Subhankrita ) 11-6,11-6,11-5,11-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. कौशल्य व कष्टाच्या जोरावर तनिषाने या स्पर्धेत यश संपादन केले.
मेहनतीचे चीज झाले- राष्ट्रीय विजेतेपद माझ्यासाठी खूपच मोलाचे आहे. गेल्या दोन स्पर्धेत ही कामगिरी चांगली झाली. पण उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली होती. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली ( Tanisha Kote reaction on match ) होती. त्या मेहनतीला यश मिळाले याचा आनंद असल्याचे विजेत्या तनिषा कोटेचा ( national championship of Nashik ) हिने सांगितले.