नाशिक - संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाचा तडाखा अधीक जाणवत असून अनेक भागात पाणी टंचाई निर्माण ( Nashik Water Scarcity ) झाली आहे. मात्र वाढत्या उन्हात प्रशासनाच्या निर्णय न आता नागरिकांना वेळेत टॅंकर मिळवून आपली तहान भागवण्यास मदत होत असल्याचे चित्र बघायला मिळतय, सद्या नाशिक जिल्ह्यातील 125 गावे आणि वाड्यांना 58 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने ( Nashik Zilla Parishad Water Supply Department ) देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांचे आदेश - नाशिक जिल्हात मागील वर्षीपेक्षा यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. तापमानातही विक्रम वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढत आहे. ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची वणवण होते आहे. अनेक गावांमध्ये महिला भर पुन्हात डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करत करताना दिसतात. तर काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यात महिला हंडाभर पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरतानाचे चित्र बघायला मिळाले. अशात पाणी टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असून पाणी टँकरच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यास जिल्हा प्रशासनाकडून विलंब होऊ नये. यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या स्तरावरच पाणी टॅंकरचे या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डी. गंगाधरण यांनी दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंजूर करून टँकर सुरू करा असे आदेश देखील पालकमंत्री भुजबळ यांनी दिलेत. त्यामुळे यंदा मागणी तिथे टँकर उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहे.