नाशिक - मोबाईल रिमोट विरहित तळ हातावरील हालचालींनी ड्रोन संचलन करणारी प्रणाली आरएच सपट अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विकसित ( Drones navigation system with mobile remoteless ) केली. यासाठी उत्कृष्ठ इनोव्हेशसाठी अनेक पारितोषिकेही त्यांनी पटकावली आहेत. ( Nashik student project on drone innovation )
नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित आर एच सपट अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकल्पअणू विद्युत व दूरसंचार विभागात अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अभिषेक दीक्षित, मानस जकातदार व संपदा राऊत यांनी हाताच्या हालचालींवर नियंत्रित केली जाणारी ड्रोन प्रणाली विकासात केली आहे. कॉम्प्युटर विजन आणि ऑब्जेक्ट ट्रेकिंग अशा प्रणालीने तळ हाताच्या आधारे ड्रोन उड्डाण करू शकते, वापरकर्त्याला त्यांच्या हातांच्या विविध पूर्वनिर्धारीत हालचालींनी फिरणाऱ्या ड्रोनमधून छायाचित्रही घेता येणार आहे.
तळहाताच्या हालचालीवरुन मिळते ड्रोनला कमांड उत्कृष्ट पारितोषिके मिळाली -हावभाव ही शरीराची दृश्यमान क्रिया आहे. दैनंदिन जीवनात त्याच्या सहाय्याने अनेक गोष्टी सूचित केल्या जातात. त्यांचा वापर संवादाच्या उद्देशाने होतो. या हावभावाची पडताळणी हे प्रगत संशोधनापैकी एक आहे. जे मानव यंत्र परस्पर संवादासाठी मार्ग उपलब्ध करते. या आधारे ही प्रणाली विकसित झाली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ड्रोन संचलनाचे सर्वत्र कौतुक होत असून आतापर्यंत त्यांच्या या प्रोजेक्टला तीन उत्कृष्ट पारितोषिके मिळाली आहे.
हँड जेश्चर रेकग्निशन -हँड जेश्चर रेकग्निशन हे प्रगत संशोधन क्षेत्रांपैकी एक आहे. जे मानव-मशीन परस्पर संवादासाठी मार्ग प्रदान करते. हँड जेश्चर रेकग्निशन मानवी-संगणक परस्परसंवाद (HCI) साठी एक बुद्धिमान पद्धत प्रदान करते. हावभाव कोणत्याही शारीरिक हालचाली किंवा स्थितीतून उद्भवू शकतात. परंतु सामान्यतः चेहरा किंवा हातातून उद्भवतात. फील्डमधील सध्याच्या फोकसमध्ये चेहरा आणि हाताने जेश्चर ओळखण्यावरून भावना ओळखणे समाविष्ट आहे. बटणे आणि टॉगल, मोशन सेन्सर्स, कीबोर्ड, टच स्क्रीनपासून ह्यूमन-मशीन इंटरफेस (HMI) च्या नवीन अधिक हँड्स-फ्री फॉर्म्स जसे की स्पीच-रिकग्निशन इंटरफेसमध्ये विकसित होत. गेल्या दशकात आम्ही आमच्या मशीनशी संवाद साधण्याचा मार्ग नाटकीयरित्या बदलला आहे. मानवांमधील परस्पर संवादाइतकेच नैसर्गिक संगणकासह परस्पर संवाद घडवून आणणे, हे अंतिम उद्दिष्ट असे प्राध्यापक राहुल शिंपी यांनी सांगितले.
हेही वाचा -Rajya Sabha Elections: राज्यसभेसाठी उद्या मतदान; 'या' राज्यात घोडेबाजाराची शक्यता