महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Electric Bike New Guideline : नाशिक आरटीओकडून 7 इलेक्ट्रिक वाहने जप्त, जाणून घ्या ईलेक्ट्रिक बाईक्स संदर्भातील नवे नियम

इलेक्ट्रिक वाहनात बेकायदेशीररित्या बदल करणाऱ्या वाहनचालकांवर नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत अशी 12 वाहने आढळली असून, त्यापैकी 7 वाहनांवर आतापर्यंत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ( Electric Bike New Guideline )

By

Published : May 26, 2022, 7:51 PM IST

Electric Bike New Guideline
नाशिक आरटीओकडून 7 इलेक्ट्रिक वाहने जप्त

नाशिक - इलेक्ट्रिक वाहनात बेकायदेशीररित्या बद्दल करणाऱ्या वाहनचालकांवर नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत बारा इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई करत, सात इलेक्ट्रिक वाहने जप्त केली आहेत. ( Electric Bike New Guideline )

इलेक्ट्रिक वाहनात बेकायदेशीररित्या बदल करणाऱ्या वाहनचालकांवर नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत अशी 12 वाहने आढळली असून, त्यापैकी 7 वाहनांवर आतापर्यंत जप्तीची कारवाई करण्यात आली ( nashik rto seizes 7 Electric Bike ) आहे. संबंधित वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून,वाहनात अनधिकृतपणे बदल करण्याच्या गुन्ह्यात एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.

नाशिक आरटीओकडून 7 इलेक्ट्रिक वाहने जप्त

काय आहे नियम -इलेक्ट्रिक बाइक्सची ताशी वेगमर्यादा 25 किलोमीटरपेक्षा अधिक करण्यासाठी बॅटरीची क्षमता 250 व्हॅट हून अधिक वाढवून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. ई-बाइक्समध्ये अशा प्रकारे केलेले बदल यामुळे वाहने जळून खाक होण्यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे असे बदल करणाऱ्या व करवून घेणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करा. असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात आरटीओची पथके ई-बाइक्समध्ये बदल करणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज झाले आहेत.



7 वाहने जप्त -गेल्या दोन दिवसांत शहरासह जिल्ह्यात ई-बाइक्सची तपासणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १२ वाहनांत अनधिकृतरित्या बदल करून घेतल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत त्यापैकी सात वाहनांची जप्ती करण्यात आली. ई बाइकमध्ये अनधिकृतपणे बदल केल्यास एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी दिली. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे भगत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Goat Farming Success Story : सावित्रीची गरुड झेप; महिलांची शेळी पालन संस्थेतून एक करोडची उलाढाल

हेही वाचा -Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; 20 जूनला मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details