महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Municipal Hospital : नाशिककर ताप सदृश आजारांनी त्रस्त, पालिका रुग्णालयात 3000 रुग्णांची नोंद - Nashik Municipal Hospital

नाशिकमध्ये ( Nashikkar suffers from fever like diseases ) साथी साथरोगजन्य आजारांनी नागरीक त्रस्त आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या ( 3000 patients registered in the municipal hospital ) रुग्णालयात 10 दिवसात ताप सदृश्य आजाराच्या 3000 रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Hospital) डॉक्टरांनी केल आहे.

Nashik
नाशिक

By

Published : Jul 11, 2022, 12:36 PM IST

Updated : Jul 11, 2022, 7:33 PM IST

नाशिक:नाशिकमध्ये पावसाने जोर धरला असताना आता साथी साथरोगजन्य आजारांनी तोंड वर काढायला सुरवात केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात (Nashik Municipal Hospital) 10 दिवसात ताप सदृश्य आजाराच्या 3000 रुग्णांची (3000 patients registered in the municipal hospital) नोंद झाली आहे. तसेच डेंगूच्या आजाराचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलयं.

नाशिककर ताप सदृश आजारांनी त्रस्त

डेंगू, स्वाइन फ्लूचाही प्रवेश :नाशिकमध्ये गेल्या आठवड्या पासून पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचेरोग तसेच कीटकजन्य आजाराने तोंडवर काढले आहे. पावसाळ्याच्या पाण्याच्या डबक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या डासांमुळे विविध आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत 49 जणांना डेंगूची लागण झाली असून ,दोन वर्षानंतर प्रथमच स्वाइन फ्लूचेही 2 रुग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत,नाशिक महानगरपालिकेच्या मागील दहा दिवसात तापसदृश्य आजाराचे 3000 रुग्णांची नोंद झाली आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ताप सदृश्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


महानगरपालिकेचे दुर्लक्ष:नाशिक मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. अशा काही ठिकाणी गेल्या चार ते पाच महिन्यापासून रस्त्याची कामे अर्धवट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आणि अशात रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने,येथे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच महानगरपालिकेकडून पेस्ट कंट्रोलचा ठेका अद्याप कोणाला देण्यात आला नसल्याने शहरात डासांनी उच्छाद मांडला असल्याचं चित्र आहे.


काय घ्यावी काळजी...:जास्त दिवस स्वच्छ पाणी साठवून ठेवलं तर त्यावर डेंग्यूच्या डासांची निर्मिती होत असते. अशात पावसाळ्यात आपल्या बाजूला असलेले डबकी,नारळाच्या वरवंट्या,कुंड्या खालील प्लेट,बिल्डिंग चे बेसमेंट यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या आजाराची लक्षणे यात उच्च प्रतीचा ताप येणे, डोके दुखणे, अंगावर लाल पुरळ येणे, अशक्त पणा वाटणे हे आहेत,तसेच श्वास घेण्यास त्रास होतो. अतिसार आजर टाळण्यासाठी पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरील अन्न खाऊ नये,शिळे अन्न खाऊ नये, यामुळे अतिसार होण्याची शक्यता अधिक असते. या आजाराचे लक्षण म्हणजे ताप,खोकला,सर्दी जुलाब,उलट्या,अशक्त पणा वाटणे हे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरील अन्न खाणं टाळावे तसेच पाणी सुद्धा उकळून प्यावे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे.



हेही वाचा:Rainy Season : पावसाळ्यात त्वचेचे आजारांपासून संरक्षण करणे आहे आवश्यक

Last Updated : Jul 11, 2022, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details