नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके न वाजण्याच्या शासनाच्या आदेशाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त दिवाळी म्हणून साजरी केली. मागील वर्षीपेक्षा यंदा 192 टन कचरा घटला असल्याचे नाशिक महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी हिवाळ्यात दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिवाळीत वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे यात भर पडू शकते, असे आरोग्य विभागाला वाटत असल्याने यंदाच्या दिवाळीत फटाके वाजवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनी कमी प्रमाणात आणि प्रदूषण होणार नाही, असे फटाके वाजून दिवाळीचा आनंद साजरा केला.
हेही वाचा - नितीश कुमार यांना भाजपाने तात्पुरते मुख्यमंत्री केलयं'
दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये मागील वर्षीपेक्षा फटाक्यांचा तब्बल १९२ टन कचरा कमी झाला आहे. गेल्या वर्षी दिवाळीत ३३ लाख २१ हजार २८० किलो कचरा शहरात गोळा झाला होता. यावर्षी ३१ लाख २९ हजार ४९० किलो कचरा संकलित झाला असून यंदा फटाक्यांमुळे कचरा तर कमी झाला मात्र प्रदूषण रोखण्यास ही मदत झाली.
#प्रशासनाला नाशिककरांनी साथ
दिवाळी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जात असल्यामुळे हवा प्रदूषण वाढण्याची भीती होती. कोरोना पुन्हा वाढू नये यासाठी महानगरपालिका स्तरावर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी जनजागृतीवर भर दिला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून यंदा नाशिककरांनी कमीत कमी फटाके वाजवून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली आणि त्यामुळे यंदाच्या दिवाळीत पाच दिवसात मागील वर्षाच्या तुलनेत १९२ कचरा कमी झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा - अवघ्या तीन तासाचे शिक्षणमंत्री! पदभार स्वीकारल्यानंतर काहीवेळातच दिला राजीनामा