महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक पोलिसांची दबंग कामगिरी,अट्टल साखळी चोराला केली अटक;71 तोळे सोने केले जप्त - Nashik Police's domineering performance,

नाशिकच्या दोन पोलिसांनी दबंग कामगिरी करत एका सराईत चोराला अटक करून त्याच्याकडून 56 गुन्ह्यांची उकल करत 71 तोळे सोने हस्तगत केले आहे. नाशिकच्या इतिहास पाहिल्या एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लागल्याने पोलीस आयुक्तांनी या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांना रोख रक्कम देऊन सत्कार केला आहे.

पोलीस अधिकारी घनश्याम भोये आणि मिलींद परदेशी
पोलीस अधिकारी घनश्याम भोये आणि मिलींद परदेशी

By

Published : Nov 2, 2021, 3:50 AM IST

नाशिक - नाशिकच्या दोन पोलिसांनी दबंग कामगिरी करत एका सराईत चोराला अटक करून त्याच्याकडून 56 गुन्ह्यांची उकल करत 71 तोळे सोने हस्तगत केले आहे. नाशिकच्या इतिहास पाहिल्या एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लागल्याने पोलीस आयुक्तांनी या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांना रोख रक्कम देऊन सत्कार केला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

71 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत

नाशिक शहरात मागील तीन वर्षांपासून महिलांच्या गळ्यातील साखळी चोरणांरांचा सुळसुळाट सुरू आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत होते. अशात गंगापूर पोलिसांनी एक मोठी कामगिरी करत, मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या तुरी देणारा दंगल उर्फ उमेश पाटील याला अखेल अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, त्याच्याकडून 56 गुन्ह्यांची उकल झाली असून 71 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 29 लाख 32 हजार 176 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

नाशिक पोलिसांची दबंग कामगिरी
असा सापडला चोर

गंगापूर रोड भागात वारंवार होणाऱ्या महिलांच्या गळ्यातील साखळी चोरीच्या घटनांमुळे गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या टीमने या भागात सध्या वेशात गस्त वाढवली होती. अशात गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घनश्याम भोये, मिलींद परदेशी हे गस्त घालत असतांना आसाराम बापू पूल परिसरात एक संशयित गाडीवरून रस्त्याने चालणाऱ्या महिलेला बघून यु टर्न मारून तिच्या दिशेने येत असल्याचे त्यांना दिसला. संशयित हा आधीच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही दिसणाऱ्या व्यक्ती सारखा दिसल्याने पोलीस वेळ न घालवता त्याच्या समोर गाडी उभी करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. संशयितांने लगेच गाडी वळून पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांचा दुचाकीने त्याच्या गाडीला धडक त्याला खाली पाडत त्यांच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतल आहे. या घटनेत दोघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायाला किरकोळ जखमा झाल्या. अशात त्याची चौकशी केली असता संशयित उमेश पाटील याने 3 वर्षात आता पर्यंत 56 चेन स्नॅचिंग केल्याचे कबूल केले आहे. यांच्याकडून पोलिसांनी 71 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 29 लाख 32 हजार 176 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तीन सराफ व्यावसायिक ताब्यात

या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करत संशयीत हा चोरलेले सोन्याचे दागिने सराफ बाजारातील सराफ व्यासायिकांना विकत असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आतापर्यत 7 संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अशोक वाघ, मुकुंद बागुल, मुकुंद दयानकर या सराफांचा समावेश आहे.

उच्च शिक्षित गुन्हेगार

संशयित उमेश पाटील आणि त्याचा साथीदार तुषार ढिकले हा उच्च शिक्षित असून गर्लफ्रेंडला सोबत घेऊन मौजमजा करण्यासाठी तो महिलांच्या सोन्याच्या साखळ्या चोरत असल्याचे पोलीस तपासात समोर आहे.

चोरीतून जमवली एवढी माया

संशयित मुख्य आरोपी उमेश पाटील यांच्या मालमत्तेची पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे 48 लाखाचा फ्लॅट, एक क्रेटा कार खरेदी केल्याचे तसेच बँक खात्यात 20 लाख रुपये जमा असल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details