नाशिक - शहरामध्ये दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी सुरू केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे. संशयित वाहनांची तपासणी करून कागदपत्रे, परवाना आदींची तपासणी करण्यात येत आहे.
गर्दीत चोरीच्या घटनांवर वचक बसवण्यासाठी प्रयत्न -
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हीच संधी साधून चोरटे बॅग लिफ्टिंग, चेन स्नाचिंग, पाकीटमारी करत आहेत. या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात ठिकाणी नाकेबंदी सुरू केली आहे. बाजारपेठांमध्ये चोरीच्या घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.