महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशकात व्यावसायिकाकडे सहायक पोलीस निरीक्षकाची खंडणीची मागणी, आयुक्त नांगरे-पाटलांनी केले निलंबित - deepak girme

पंचवटी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे गिरमे यांनी आठवड्याभरापूर्वी टकले नगरमधील व्यवसायिक मयूर सोनवणे यांच्या घरी मध्यरात्री साडेबारा वाजता जाऊन मयूर याला ताब्यात घेतले होते.

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक

By

Published : May 15, 2019, 6:20 PM IST

Updated : May 15, 2019, 10:49 PM IST

नाशिक - व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्याकडे दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांच्यावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी चौकशी करून निलंबनाची कारवाई केली आहे. यावरून कायदा हातात घेणाऱ्या खाकीलासुद्धा पाठीशी घालणार नाही, असाच संदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे गिरमे यांनी आठवड्याभरापूर्वी टकले नगरमधील व्यवसायिक मयूर सोनवणे यांच्या घरी मध्यरात्री साडेबारा वाजता जाऊन मयूर याला ताब्यात घेतले होते. त्याला गाडीत बसून आडगाव येथे नेऊन त्याला तू काळाबाजार करतो असा ठपका ठेऊन गिरमे यांना बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील ६० हजार रुपये देखील काढून घेतले. याबाबतची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर दबाव आणून जबाब बदलण्यास भाग पाडले होते. याविषयीची मयूर यांनी गिरमे यांच्या विरोधातील तक्रार विश्वास नागरे-पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रकरणी चौकशीचे आदेश उपायुक्तांना दिले होते. आठवड्याभरात चौकशी पूर्ण करून अहवालात गिरमे यांच्यावर आर्थिक तोडपाणी करण्याचा ठपका ठेवण्यात येऊन त्यांच्या निलंबनाचे आदेश विश्वास नांगरे - पाटील यांनी दिले आहेत.

निरमे यांची आता पर्यंतची वादग्रस्त कारकीर्द..
महाविद्यालयांनी युवकांना तुमचे करिअर उद्ध्वस्त करून टाकण्याची धमकी देणे. रात्र पाळीच्या पेट्रोलिंगमध्ये तोडपाणीचा सातत्याचे प्रयत्न करणे, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून संशियत आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गिरमे यांना थेट विमानाने पाठवले होते, मात्र रेल्वेने आणतांना संशयित तुरी देऊन फरार. दोन महिन्यांपूर्वी अत्याचार झालेल्या महिलेला अनेक तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा पीडित महिलेच्या नातेवाईकांचा आरोप. यात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून गिरमे यांना समज देण्यात आली होती. किरकोळ घटनेत संशयितावर चक्क प्राणघातक हल्ल्याच्या गुन्हाची डायरीवर नोंद. अशी गिरमे यांचे आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त ठरली. यावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केलेल्या कारवाईबाबत सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Last Updated : May 15, 2019, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details