नाशिक : नाशिक शहरात मागील 15 दिवसांपासून खून, चोऱ्या, हाणामाऱ्यांचे सत्र सुरू असून, नागरिक भयभीय झाले आहेत. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावर वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naikan) यांनी धडक कारवाईचे दिले आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशनंतर पोलिसांनी शहरात कोम्बिग ऑपरेशन (combing operation in nashik city) राबवत वेगवेगळ्या ठिकाणी 218 गुन्हेगारांवर कारवाई केली. या कारवाई नंतर शहरातील गुन्हेगारी कमी होईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
5 तारखेला रात्री कोम्बिग ऑपरेशन : रिमंडळ 1 मधील 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन हे ऑपरेशन आले. 218 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात (Action against criminals) आली. परिमंडळ 1 मधील भद्रकाली, पंचवटी, मुंबई नाका, गंगापूर, सरकार वाडा आडगाव, महसूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकाने रात्री गस्ती दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन करत टवाळखोर कारवाई (Strict action taken criminal) केली.