नाशिक - जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबक नाक्यावरील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. अच्छे दिनच्या घोषणेचा विसर पडून निवडून दिलेल्या भाजपा सरकारच्या दरवाढीबद्दल गांधीगीरी आंदोलन पुकारले. यासाठी पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबाचे फूल दिले.
पेट्रोल डिझेलची दरवाढ; केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं 'गांधीगिरी' आंदोलन - protest in nashik
जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबक नाक्यावरील पेट्रोल पंपावर आंदोलन केले. अच्छे दिनच्या घोषणेचा विसर पडून निवडून दिलेल्या भाजपा सरकारच्या दरवाढीबद्दल गांधीगीरी आंदोलन पुकारले. यासाठी पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबाचे फूल दिले.
पेट्रोल व डिझेलची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने अजून महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होतीय. मात्र केंद्रातील भाजपा सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कोणतेही देणेघेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने पेट्रोल पंपावर दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी 'एक भूल, कमल का फुल' असा नारा देण्यात आला. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना संबंधित मागणीचे निवेदन देण्यात आले. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या गांधीगिरी आंदोलना प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, आदी मास्क घालून व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सहभागी झाले होते.