महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नैसर्गिक नाले गिळंकृत करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एमआरटीपी अंतर्गत पहिला गुन्हा दाखल - First offense filed under MRTP

नाशिकचे महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशानंतर म्हसरूळ येथील नैसर्गिक नाला गिळंकृत केल्याप्रकरणी एमआरटीपी कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नैसर्गिक नाले बुजवून त्यावर मोठ्या इमारती बांधणाऱ्यांवर नाशिक महानगरपालिकेने ( Nashik Municipal Corporation ) दणका दिला आहे.

Nashik natural streams
नैसर्गिक नाले गिळंकृत करणाऱ्यांना महापालिकेचा दणका

By

Published : Jun 6, 2022, 6:58 PM IST

नाशिक - नैसर्गिक नाले बुजवून त्यावर मोठ्या इमारती बांधणाऱ्यांवर नाशिक महानगरपालिकेने ( Nashik Municipal Corporation ) दणका दिला आहे. नाशिकचे महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशानंतर म्हसरूळ येथील नैसर्गिक नाला गिळंकृत केल्याप्रकरणी एमआरटीपी कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

एमआरटीपी कायद्या नुसार शहरातील पहिला गुन्हा दाखल -नाशिक शहरात गेल्या काही वर्षात मोठी बांधकामे करताना नैसर्गिक नाल्यांचे पात्र बुजवले टाकलेत. काही ठिकाणी नाल्या लगतच बांधकामे करताना भराव टाकल्यामुळे पात्र संकुचित झाले आहे. काळाच्या ओघात काही नाले तर अक्षरशः गायब झालेत. हे सर्व नाले पावसाळ्यात पुन्हा मोकळे होऊन थेट घरात पाणी जायचे प्रकार होत आहेत. बिल्डर बांधकाम करून मोकळा होतो, मात्र भविष्यात याचा फटका रहिवाशांना बसत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेत बोर्ड ऑफिसर ते सह आयुक्त असा प्रवास करण्याचा अनुभव असल्यामुळे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील नैसर्गिक नाल्यांचा आढावा घेतला. त्यात म्हसरूळ शिवारात परस्पर नैसर्गिक नाले सिमेंट पाईप टाकून बंदिस्त करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावर आयुक्त पवार यांनी संबंधित मिळकत धारक असलेले तिवारी, अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शाखा अभियंता पंकज बाप्ते यांच्या फिर्यादी वरून एमआरटीपी कायद्या नुसार शहरातील पहिला गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

नैसर्गिक नाले गिळंकृत करणाऱ्यांना महापालिकेचा दणका

कायद्यात जेलवारी निश्चित -50 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने नैसर्गिक नाले बंदिस्त केल्यामुळे मुंबई ते 2006 च्या सुमारास भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याचा अभ्यास असल्यामुळे हे प्रकरण नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्यात जामीन मिळत नसल्यामुळे जेलवारी निश्चित मानली जात आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे भविष्यात अशा पद्धतीने नाले बंदिस्त करणारे यापुढे धजावणार नाही हे मात्र निश्चित आहे.

हेही वाचा -Varanasi Blast Case : वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

हेही वाचा -Shivsena Teaser : सत्ता असो वा नसो, आमचं हिंदुत्व तकलादू नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details