नाशिक -नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प ( Nashik Budget present by Administration ) आज सादर झाला आहे. २२१९ कोटी प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केला आहे. कोणतीही करवाढ नसलेला २२१९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ( No tax proposals in Nashik Budget ) आज स्थायी समितीत सादर केले.
नाशिक महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज आयुक्त कैलास जाधव यांनी ( Nashik corporation commissioner Kailash Jadhav ) सादर केले आहे. हे सहाव्या पंचवार्षिकमधील अखेरच्या वर्षाचे ( Last budget in five years plan ) अंदाजपत्रक आहे. महापालिकेचे आयुक्त जाधव यांनी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हे अंदाजपत्रक ठेवले. यासाठी सभापती गणेश गीते यांच्याकडे आयुक्त कैलास जाधव यांनी अंदाजपत्रक दिले आहे.
हेही वाचा-घोटीच्या सेंद्रिय हळदी प्रकल्पाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट.
- नाशिकच्या बिटको रुग्णालयात मेडिकल कॉलेज उभारणी करता ६५ कोटी रुपयांची तरतूद
- सार्वजनिक बांधकाम करता सर्वाधिक ३७८ कोटी रुपयांची तरतूद
- पर्यावरण आणि गोदावरी संवर्धन करता गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने निधी यंदाच्या वर्षी २८ कोटी ८८ लाखाचा निधी
- भावी नगरसेवकांसाठी एकूण ८५.९८ कोटी , गेल्या वर्षी हाच निधी २३७ कोटी इतका होता.
- नाशिककरांवर घरपट्टी पाणीपट्टी अतिरिक्त बोजा नाही , तर कोणतीही करवाढ नाही
- नगरसेवक निधीतून कोणतीही वाढ नाही ३० लाख वार्षिक निधी कायम
- नाशिक शहरबस सेवेसाठी ९० कोटीची तरतूद
- नाशिकशहरातील उद्यान विकासासह सहाही विभागात १० हजार वृक्ष लागवडीसाठी २१ कोटीची तरतूद
- शहरात उभारल्या जाणाऱ्या आयटी पार्कसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद
- महापालिका निवडणूक खर्चासाठी १५ कोटी रुपयांचा निधी
- ई - स्मार्ट स्कूल योजना प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात १५ कोटी रुपयांसह एकूण शिक्षणासाठी २६ कोटीची तरतूद, शहरातील ६ विभागात स्मार्ट स्कूल उभारणार
- शिक्षणाच्या योजना करता ड्रोन सर्वेक्षण मॅपिंग करणार
- बांधकाम व्यवसायिकांना इलेक्ट्रिक वाहनचार्जिंग स्टेशन बंधनकारक करणार
- महापालिका पर्यावरण पूरक भांडे खरेदी करणार
- शहराच्या मुंबईनाका परिसरात महात्मा फुले सावित्रीबाई फुले संयुक्तिक पुतळ्यासह, पश्चिम विभागात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिडी भालेकर येथे अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा, पंचवटीत महाराणा प्रताप पुतळा उभारणारण्याचा प्रस्ताव
हेही वाचा-Complaint File Against Police : गैरवर्तन करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्राच्या रणरागिणीचा हिसका
अंदाजपत्रकाला मान्यता मिळाल्यानंतर सभेत होणार सादर-