नाशिक - शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून नाशिक महानगरपालिकेकडून तीन लाख लोकांच्या तपासणीचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. शहरातील दाट लोकवस्तीमध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे महानगरपालिकेन सांगितले आहे.
नाशिकच्या वडाळा, सातपूर आदी दाट वस्ती असलेल्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून भविष्यात ह्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे. त्यासाठी 200 वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून 69 हजार घरांमधील तीन लाख नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात विशेषतः ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण तपासले जाणार आहेत.