महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मालेगाव महापालिकेतील सुरक्षा साहित्याचा सावळा गोंधळ आयुक्तांनीच केला उघड - health kit wadia hospital malegaon

महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी माहापालिकेचे अधिकारी व डॉक्टरांसह पालिकेच्या वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षाची पहाणी केली. यावेळी भांडारात साडेतीन हजार पीपीई किट, २० हजार मास्क, २ हजार एम-९५ मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर, औषधी गोळ्या असे सामान पडून असल्याचे आयुक्तांना दिसून आले.

health kit wadia hospital malegaon
रुग्णायात तपासणी करताना आयुक्त

By

Published : May 6, 2020, 3:09 PM IST

नाशिक- एकीकडे मालेगाव शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे महानगरपालिकेतील सावळागोंधळ समोर आला आहे. शहरात आरोग्य सेवेतील डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने पीपीई किट व सुरक्षा साहित्य खरेदी केले होते. मात्र, हे साहित्य उपयोगी लावण्या ऐवजी ते पालिकेच्या वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षातच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

माहिती देताना मालेगाव महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार

सुरक्षा साहित्य मिळाले नसल्याची तक्रार डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावर महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी माहापालिकेचे अधिकारी व डॉक्टरांसह पालिकेच्या वाडिया रुग्णालयाच्या भांडार कक्षाची पहाणी केली. यावेळी भांडारात साडेतीन हजार पीपीई किट, २० हजार मास्क, २ हजार एम-९५ मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर, औषधी गोळ्या असे सामान पडून असल्याचे आयुक्तांना दिसून आले. हा धक्कादायक प्रकार पाहून या सुरक्षा साहित्याच्या वितरणाची जबाबदारी असलेले भांडारपाल राहुल ठाकूर व कदीर नामक कर्मचऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहे.

हेही वाचा-कोरोनामुळे 20 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू, नाशिक शहरातील पहिला बळी

ABOUT THE AUTHOR

...view details