नाशिक - बेपत्ता झालेल्या तरुणीचा चारचाकी गाडीत मृतदेह आढळला आहे. नाशिकच्या इंदिरानगर भागातून बेपत्ता झालेल्या 21 वर्षीय मुलीचा मुत्यु झाल्याची बाब यातून स्पष्ट झाली. श्रीपर्ण राय असे मुलीचे नाव आहे. गंगापूर परिसरात हॉटेल गंमत जंमत परिसरात एका चारचाकी गाडीत तिचा मृतदेह होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.
नाशिक - बेपत्ता तरुणीचा तिच्याच गाडीत आढळला मृतदेह - Nashik girl suicide or murder
नाशिकमध्ये बेपत्ता तरुणीचा तिच्याच कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या अपहरणाची तक्रार घरच्यांनी पोलिसात केली होती. त्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.

अपहरणाची केली होती तक्रार
नाशिकच्या इंदिरानगर भागात राहणारी श्रीपर्ण रॉय या 21 वर्षीय मुलीचं सोमवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी अपहरण झाल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. काल गंगापूर परिसरात हॉटेल गंमत जंमत जवळ चार चाकी गाडीत श्रीपर्ण ही मृत अवस्थेत मिळून आली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हत्या की आत्महत्या यासह अनेक प्रश्न उपस्थित
-श्रीपर्ण राय हिचा मृतदेह स्वतःच्या गाडीत मिळून आला ?
-श्रीपर्ण स्वतः घरातून गेली की तिचे अपहरण झाले?
-श्रीपर्ण हिच्या शवविच्छेदनामध्येसुद्धा मृत्यूचे कारण आले नाही ?
-बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवस श्रीपर्ण कुठे होती असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत