महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक मतदारसंघात ५९.४० टक्के मतदान, मागील निवडणुकीच्या तुलनेत दीड टक्क्यांनी वाढ - लोकसभा

नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८३२ हजार ८९६ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार ५२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ११ लाख ३४ हजार ७१९ मतदारांनी मतदान केले.

नाशिक मतदान

By

Published : Apr 30, 2019, 3:45 PM IST

नाशिक - लोकसभा निवडणुकीची मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८३२ हजार ८९६ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार ५२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१४ मध्ये ५८ टक्के इतके मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ५९.४० टक्के मतदानासह दीड टक्क्याने मतदानात वाढ झाली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ११ लाख ३४ हजार ७१९ मतदारांनी मतदान केले. २०१४ मध्ये ६३.५२ टक्के मतदान झाले होते. २०१९ साली २ टक्के वाढीसह ६५.६४ टक्के मतदान झाले आहे.

नाशिक मतदन

नाशिक लोकसभा मतदार संघातील तालुक्यांच्या मतदानाची आकडेवारी

१. सिन्नर - ६४.९७ टक्के मतदान
२. नाशिक पूर्व - ५५.०६ टक्के मतदान
३. नाशिक मध्य - ५५.९५ टक्के मतदान
४. नाशिक पश्चिम - ५५.४३ टक्के मतदान
५. देवळाली - ६०.७२ टक्के मतदान
६. इगतपुरी - ६७.४१ टक्के मतदान

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील तालुक्यांच्या मतदानाची आकडेवारी


१. नांदगाव - ५७ .४९ टक्के मतदान
२. कळवण - ७२.३६ टक्के मतदान
३. चांदवड - ६५.०७ टक्के मतदान
४. येवला - ६१.३१ टक्के मतदान
५. निफाड - ६३.३१ टक्के मतदान
६. दिंडोरी - ७२.०५ टक्के मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details