महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांची प्रचार-प्रसिद्धी करावी'

सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 32व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

bhujbal
bhujbal

By

Published : Jan 19, 2021, 4:09 PM IST

Updated : Jan 19, 2021, 7:33 PM IST

नाशिक - रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची अंमलबजावणी आवश्यक असून, त्यासाठी ट्रक, ट्रेलरसह मोठ्या स्वरूपाच्या मालवाहतूक वाहनांना परवाना दिल्यानंतरही दर तीन ते चार वर्षांनी या वाहनचालकांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करावे. इतकेच काय तर वाहनचालकांच्या डोळ्यांची नियमित तपासणीही करावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी रस्ता सुरक्षिततेची शपथ घेण्यात आली.

रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याने अपघातात वाढ

रस्त्यांवर सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या घटना नियंत्रणात याव्या तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राज्यभरात सह देशभरात राबविण्यात येते. सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 32व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही वाहतूक नियमावलीचा प्रचार आणि प्रसिद्धी करावी आणि लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे मार्गदर्शक पुस्तिका दूरचित्रवाणी रेडिओ पथनाट्य याद्वारे जनजागृती करण्यात यावी, तसेच अनेक अपघात वाहन चालकामुळे आणि रस्ते चांगले असल्याने होतात पूर्वीच्या काळात खड्डे जास्त असल्याने वाहनांची वेग कमी राहिला. आता रस्ते चांगले असल्याने वेग जास्त असतो. परिणामी अपघात जास्त होतात, असे छगन भुजबळ यानी सांगितले आहे.

भाजीपाल्याच्या वाहनांसाठी ऑनलाइन पासेस

रस्ता सुरक्षेवर उपस्थितांचे प्रबोधन करून सर्वांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले असून यावेळी उपस्थितांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पिकलेला भाजीपाला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत भाजीपाल्याच्या वाहनांसाठी ऑनलाइन पासेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कौतुक केले. दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी विविध शासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Jan 19, 2021, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details