महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जेलचा आणि माझा जवळचा संबंध, तेथेही चांगला सत्कार झाला - छगन भुजबळ - नाशिक जेल

माझा सर्व कारागृहातील अधीक्षकांनी सत्कार केला. मी जेलमध्ये गेलो तेव्हाही चांगला सत्कार झाला, असे गंमतीने सांगत दिवस बदलत राहतात. आज मी पुन्हा कारागृहाच्या कार्यक्रमाचा सत्कार घेत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले आहे. नाशिक कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या साहित्य प्रदर्शन उद्धघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

छगन भुजबळ
छगन भुजबळ

By

Published : Oct 30, 2021, 3:07 PM IST

नाशिक - सन १९२७ साली हे कारागृह तयार झाले. साने गुरुजींच्या आठवणी इथे आहेत. कारागृहात नाना प्रकारचे लोक असतात. माझादेखील २ ते ३ वर्षांचा जेलमधील अनुभव आहे. मी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असताना अनेक कारागृहांचे उद्घघाटन केले. पोलिसांचा पगार वाढवला. त्यानंतर माझा सर्व कारागृहातील अधीक्षकांनी सत्कार केला. मी जेलमध्ये गेलो तेव्हाही चांगला सत्कार झाला, असे गंमतीने सांगत दिवस बदलत राहतात. आज मी पुन्हा कारागृहाच्या कार्यक्रमाचा सत्कार घेत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले आहे. नाशिक कारागृहातील कैद्यांनी बनविलेल्या साहित्य प्रदर्शन उद्धघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा - शेतकऱ्यांना थोडे पैसे मिळू लागले की धाडी पडतात - छगन भुजबळ

'अभिनेता संजय दत्त बनवायचा टोप्या'

अभिनेता संजय दत्त कारागृहात टोप्या बनवायचे काम करीत होता. अनेक चांगल्या वस्तू कारागृहात बनविल्या जातात. न्यायालयातदेखील येथील फर्निचर वापरले जाते. १५ हजार भरायला नाही म्हणून दोन-दोन वर्ष आत राहावे लागते. अनेक संस्था आता अशा लोकांना मदत करतात. आपणदेखील यासाठी मदत करत असतो. बंदी जरी असले तरी तो माणूस आहे, असे समजून तुम्ही त्याची सेवा करता. तुमचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details