Nashik Equipped With 2200 Oxygen Beds With 3300 Beds : नाशिक ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 3300 खाटांसह 2200 ऑक्सिजन बेड सज्ज - undefined
ओमिक्रॅानच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असा काही प्रसंग घडलाच तर धावपळ होउनये यासंठी नाशिक महानगरपालिकेने रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये 3 हजार 300 खाटा सज्ज ठेवलल्या आहेत, त्यात 2 हजार 200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा दिली आहे.
नाशिक: महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दोन्ही लाटेत सरकारी व खासगी रुग्णालयात बेडची कमतरता जाणवली काही रुग्णांचे हाल झाले.यात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची धावपळ झाली.या बाबी लक्षात घेता मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी 3300 बेड सज्ज केले असून, त्यात 2200 खाटांना ऑक्सिजन सुविधा तयार ठेवली आली आहे. तसेच प्रतिदिन 400 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध होइल याचा बंदोबस्त केला आहे.
हवेतून ऑक्सिजन निर्मिती
महानगरपालिके बरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून प्रतिदिन 23 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजन साठी 19 टाक्या असून त्याची क्षमता 246 मेट्रिक टन इतकी आहे.त्याचबरोबर 7 हजार 271 ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध असून त्यात 130 मेट्रिक टन ऑक्सिजन साठेची क्षमता आहे.
बिटको हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक बेड
बिटको रुग्णालयातील सर्व 650 बेडला ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलि आहे. गरज पडल्यास 250 बेडच्या विस्ताराची तयारी आहे. सोबतच शहरातील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात 150 बेड, ठक्कर मधील कोविड सेंटर मध्ये 325 बेड, संभाजी स्टेडियम मधील सर्व 280 बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे, त्याबरोबर मीनाताई ठाकरे स्टेडियम कोविड सेंटर येथे 380 पैकी 180 बेड, मेरी कोविड सेंटर मध्ये 200 बेड, समाजकल्याण कोविड सेंटर येथे 500 बेड, अंबड येथील कोविड सेंटरमध्ये 500 पैकी 300 बेड, सातपूर दवाखान्यात 50 बेड,सावता नगर कोविड सेंटर येथे 60 बेडची सोया करण्यात आली आहे.
परदेशी नागरिकांचे 53 अहवाल निगेटिव्ह.
गेल्या दहा दिवसात नाशिक मध्ये 240 नागरिक विदेशातून दाखल झाले,यातील 53 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.