नाशिक - मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर भोंगे ( Loudspeaker Nashik ) लावून हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर, राज्यात धार्मिक वातावरण तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये ( Nashik CP Deepak Pandey order on loudspeaker ) यांनी धार्मिक प्रथा परंपरा, रीतिरिवाज आणि कायदा सुव्यवस्थेचा विचार करीत भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश ( Nashik CP order on loudspeaker ) काढले आहेत.
सर्व धार्मिक स्थळांना भोग्यांसाठी ( Nashik CP Deepak Pandey order ) 3 मे पर्यंत पोलीस आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, भोंगे लावून नमाज म्हणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण विषयक नियम पाळावे लागणार आहे.
हेही वाचा -Nashik ST Worker Resume : नाशिकमधील एसटी पूर्वपदावर; 275 कर्मचारी कामावर परतले
तुरुंगवास किंवा हद्दपार -हनुमान चालीसासाठी परवानगीशिवाय कोणाला भोंगे लावता येणार नाही. भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास 4 महिने तुरुंगवास शिक्षा, याशिवाय थेट हद्दपार किंवा 6 महिने प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत आणखी 6 महिने कारावास करण्याची तरतूद असलेला आदेश काढण्यात आला आहे. राज्यात प्रथमच श्रीराम भूमी म्हटल्या जाणाऱ्या नाशिकलाच असा आदेश निघाला आहे.