नाशिक - हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केल्याने तणाव निर्माण झाला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील हथरस याठिकाणी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पीडित मुलीवर पोलिसानी केलेले परस्पर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबीयांना भेटायला गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की, या सर्व घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे काढून या घटनांचा निषेध करण्यात येत आहे.
हेही वाचा -दहा रुपयांचे चॉकलेट का आणले, म्हणून चिमुकलीला दिले गरम चमच्याचे चटके